राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (एनएमएमएस) शिष्यवृत्तीधारक पुढीलप्रमाणे :- श्रेया सचिन भुजबळ, प्रांजल माणिक भूमकर, सुप्रिया प्रदीप ससाने, सुयश गणेश वडघुले. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना पुढील चार वर्षांत प्रत्येकी ४८ हजार शिष्यवृत्ती मिळणार आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सुरेखा डोईफोडे, मीनाक्षी चेडे, जयश्री कापरे, शालन खेडकर यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव भुजबळ, अध्यक्षा मंगलताई भुजबळ तसेच मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण व सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले.
आठवी मध्ये शिकत असलेल्या सर्व प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता विकसित करण्यासाठी व आर्थिक सहाय्य देण्यासाठी केंद्र सरकारने २००७ पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना सुरू केली असून भुजबळ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सातत्याने यश मिळवले असल्याचे याप्रसंगी बोलताना प्राचार्य बाळासाहेब चव्हाण यांनी सांगितले,


