March 30, 2026
पुणे जिल्हा प्रतिनिधी
            दिल्लीत भारत तांदूळ प्रदर्शित करण्यात आला आहे. पीआयबीने याबाबतची पोस्ट करुन या नव्या तांदळाच्या किंमतीबाबत माहिती दिली आहे.  

        केंद्रीय अन्न मंत्री पियुष गोयल यांनी या नव्या तांदळाबाबत माहिती दिलेली होती. हा तांदुळ प्रदर्शित करुन याच्या उपलब्धे बाबत आणि किमतीबाबत माहिती पीआयबीने  पोस्टद्वारे दिली आहे.या स्वस्त भारत तांदळाची विक्री सुरू करण्यात आली असून 5 किलो आणि 10 किलो पॅकिंगमध्ये हा तांदुळ उपलब्ध असणार आहे. तसेच 29 रुपये किलो असा याचा दर असणार आहे. अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.

           पीआयबी ने केलेल्या पोस्ट वर लिहीले आहे की भारत तांदूळ केंद्रीय भंडार भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाच्या भौतिक आणि मोबाईल आउटलेटवर उपलब्ध असेल. नॅशनल ॲग्रि कल्चरल को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि नॅशनल को ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याद्वारे संयुक्त रित्या ही स्वस्त तांदूळ देण्याची मोहिम राबवण्यात येणार आहे.