March 30, 2026

सुनील भंडारे पाटील

               क्रीडा व युवक सेवा संचालनलय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शालेय तालुकास्तर कुस्ती स्पर्धा आंबळे (तालुका शिरूर) जिल्हा पुणे या ठिकाणी 26ऑगस्ट2024 रोजी पार पडल्या सदर स्पर्धेमध्ये फ्रेंड्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट कोरेगाव भीमा या शाळेच्या विद्यार्थ्यांनी गवगवीत यश संपन्न केले. 
              सदर स्पर्धेमध्ये शाळेतील सार्थक वाळके या विद्यार्थ्याने 60 किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवला तसेचसार्थक गव्हाणे या विद्यार्थ्याने 55 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविला व यशराज राऊत या विद्यार्थ्याने 90 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक

मिळवला या तीनही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेली आहे त्याबद्दल शाळेचे संचालक तसेच शिक्षक व विद्यार्थी यांच्याकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.
                 फ्रेंड्स एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूलचे सचिव दिलीप भोसले यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्यासाठी खेळाला प्राधान्य द्यावे .शरीर मजबूत करावे. आपल्या शाळेचे नाव व देशाचे नाव उज्ज्वल करावे.