March 30, 2026
रांजणगाव गणपती प्रतिनिधी 
    रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील  फियाट  कंपनीमध्ये कामगारांच्या मृत्यू कारणीभूत असलेल्या बीव्हीजी कंपनीच्या संचालकांवर सदोष  मनुष्य वधाचा  गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी केली आहे.  

रांजणगाव औद्योगिक क्षेत्रामध्ये फियाट  कंपनीमध्ये मच्छिंद्र दादाभाऊ काळे वय वर्ष ४२ राहणार शिंदोडी व सुभाष सुखदेव उघडे राहणार कुरुंद  या दोन कामगारांचा ड्रीम एरिया जवळील मैलाच्या चेंबरमध्ये काम करत असतानापडून  मृत्यू झाला.सदर कामगार हे फियाट  कंपनीमध्ये बीव्हीजी कंपनीच्या मार्फत कंत्राट कामगार म्हणून हाउस कीपिंग  काम पाहत होते. मात्र या कामगारांना कुठल्याही प्रकारचे सेफ्टी बाबत  प्रशिक्षण न दिल्या गेल्यामुळे या कामगारांचा मृत्यू झाला आहे.  कित्येक दिवस  उलटूनही या प्रकरणाची चौकशी होत नसल्यामुळे नाथा शेवाळे यांनी मुंबई मंत्रालय येथे या प्रकरणात बाबत अप्पर मुख्य सचिव (गृह विभाग)  व पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य,   यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदर घटनेची चौकशी होऊन बीव्हीजी कंपनीच्या  संचालकांवर कारवाई करावी अशी  मागणी केली आहे.  यावर त्यांनी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांना योग्य ती कार्यवाई करण्याचे आदेश दिले आहे.  अशी माहिती  नाथा शेवाळे यांनी दिली आहे.