पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा धक्कादायक प्रकार बुधवारी दि.१ रोजी दुपारी साडेबारा महात्मा फुले पोलिस चौकीत दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. किरकोळ वादातून नवनाथ ची पत्नी त्याला सोडून माहेरी राहायला आली होती. नवनाथ याने तिला नांदण्यास येण्यासाठी सांगितले, मात्र ती नांदायला येण्यास नकार दिला. त्याचा राग मनात धरून बुधवारी दि.१ रोजी सकाळी याचा जाब विचारण्यासाठी तो सासुरवाडीला गेला होता. मात्र, घरी कोणी नसल्याने त्याने पत्नीला फोन करून विचारले असता तिने महात्मा फुले पोलिस चौकीत असल्याचे नवनाथ याला सांगितले.
नवनाथ पोलिस चौकीमध्ये दाखल झाला. पोलिस चौकीत जातानी त्याने एका प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये पेट्रोल बरोबर नेहले होते. त्याठिकाणी झालेल्या वादातून नवनाथने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पोलिस चौकीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी नवनाथ यास अडवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
