याबाबत रोहित पवारांनी माहिती दिली. येत्या 24 तारखेला महात्मा फुले वाडा आणि लाल महालात जाऊन आशीर्वाद घेणार आहोत. एकुण 10 जिल्हे आणि 28 तालुक्यातून ही यात्रा जाणार आहे. पुणे ,अहमदनगर, बीड ,जालना ,परभणी, हिंगोली, वाशिम , अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूरमधून ही यात्रा जाईल. दिवसाला 18 ते 24 किमी चालणार आहोत. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाने समारोप सभा होणार आहे. पुण्यात शरद पवार साहेबांची सभा घेणार आहेत. तेव्हा शरद पवारसाहेब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील, असं रोहित पवार म्हणाले.
ही यात्रा संपल्यानंतर ज्यांनी ज्यांनी युवा धोरणाला विरोध केला आहे. ते सगळे आता आजारी पडतील, असा टोला रोहित पवार यांनी अजित पवार यांना लगावला आहे. काही दिवसांआधी अजित पवार आजारी असल्याच्या बातम्या समोर आल्या. यावेळी अजित पवार नाराज असल्याचीही चर्चा राजकीय वर्तूळात झाली. यावरून रोहित पवारांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.
