March 30, 2026
आंबेगाव प्रतिनिधी – प्रमिला टेमगिरे.
          शिवसेना उपनेते, खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव(खडकी) गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना व पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी मंजूर.

        राज्य शासनाने हा निधी दिल्यामुळे आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी गावचा पाण्याचा प्रश्न आता सुटणार असून लोकांनी व ग्रामस्थांनी आभार मानले, निधी मंजूर झाल्यानंतर तातडीने या कामाची सुरुवात झाली, त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागल्याने लोकांनी सुटकेचा श्वास सोडला, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा नियोजन समितीने १० लक्ष रूपये निधीतून मंजूर केलेल्या स्मशानभूमी परिसर सुधारणा ह्या कामाचा शुभारंभ जेष्ठ नेते विठ्ठल पोखरकर माडीवाले यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.यावेळी युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, शिवसेना शाखाप्रमुख कैलास पोखरकर, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामदासशेठ बांगर, मा.सरपंच निवृत्तीशेठ बांगर, पोलीस पाटील बबुशा वाघ, मा.ग्रामपंचायत सदस्य अनिल पोखरकर पाटील, सामाजिक कार्यकर्ते अशोक बांगर, नवनाथ बांगर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.