गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यामध्ये धर्म परिवर्तनाचे प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी चालू असल्याच्या बातम्या कानावर येत आहेत, असे प्रकार मावळ भागात सर्रास घडत असून कित्येक ठिकाणी ग्रामस्थांनी धर्म परिवर्तन करणाऱ्या अशा विचित्र लोकांना चांगलाच चोप दिला आहे, अशात गेल्या चार-पाच दिवसांपासून डिग्रजवाली तसेच पेरणे परिसरामधील लोक धर्म परिवर्तन करण्यासाठी काही लोक चकरा मारताना व ग्रामस्थांशी चर्चा करताना दिसत आहेत, तसेच धर्म परिवर्तन करण्यासाठी वेगवेगळी आमिषे दाखवली जात आहेत,हा प्रकार स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात आला असून काही ग्रामस्थांनी त्यांच्याशी चर्चा केली असता अशी लोक पळून गेलेत, त्यामुळे लोकांमध्ये चर्चेला उधाण आले असून नागरिकांकडून तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त केला जात आहे, अशा लोकांना यापुढे असा प्रकार निदर्शनास आल्यास तीव्र स्वरूपाचा चोप देण्याच्या तयारीत आहेत,
