March 30, 2026
शिरूर प्रमोद कुतवळ
        तब्बल दोन वर्षापासून कोरोना काळाने हाहाकार घातल्यामुळे कुठल्याही प्रकारचा वारीचा सोहळा हा पार पाडता आला नाही त्यामुळे आता अगदी उत्साह व आनंददायी वातावरणामध्ये जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल सणसवाडी यांच्या वतीने अगदी भव्य दिव्य व अनोख्या प्रकारे बालगोपाळांनी सुरेख व सुंदर असा वारकरी सोहळा संपन्न केला आ     .

अनोखी वेशभूषा व लहान चिमुकल्यांनी परिधान केलेले वारकरी संप्रदायाचा वेश अगदी सुंदर व मनमोहक असा होता यामध्ये गळ्यामध्ये घातलेल्या तुळशीच्या माळा, भगवे झेंडे व पताका तसेच  आकर्षक सजावटीने तयार केलेली रांगोळी तसेच तुकाराम ज्ञानेश्वर मुक्ताई संत गाडगेबाबा अशा विविध प्रकारच्या गणवेशामुळे एक अनोखे व नयन रम्य सोहळा व तसेच पखवाज विना टाळ मृदंग आदी वाद्यांमुळे व ज्ञानबा तुकाराम या गजरामुळे लहान चिमुकल्यांनी एक सुंदर असे वातावरण तयार केले होते व मनाला मोहित करेल अशी आकर्षक सजावटीची पालखी देखील तयार करण्यात आली होती व सणसवाडी गावामध्ये हा अनोखा सोहळा पूर्ण गावात मिरवणुकीच्या रूपाने या लहानग्याच्या वा वारीला अनोख महत्त्व प्राप्त झाले

      सुरुवातीला जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये संत परंपरेच्या व संस्कृतीला चालना देणाऱ्या विविध एकपात्री तसेच नाटकांचे समाजाला संदेश देणारे अनोखे विचार विविध नाटिकांमधून लहान मुलांनी सादर केले व त्यात संतांचे वेशभूषा असल्याने त्याला अनोखे महत्त्व प्राप्त झाले होते    
 त्यानंतर सदर पालखीसोबत अश्व व त्यासोबत झेंडे पताका घेऊन टाळ मृदंग घेऊन ज्ञानबा तुकाराम च्या घोषणा देत लहान गोपाळ सणसवाडी गावात पालखीची मिरवणूक काढली त नाम गजरामध्ये मुखाने हरिनाम बोलत हे खरोखरी वारी असल्याचे प्रचिती देत होते त्यात त्यातच त्यांनी तयार केलेले गोल रिंगण हे देखील मनमोहक होते व त्या ठिकाणी फुगड्या व विविध कार्यक्रम पार पाडले तसेच  लहान मुलींनी डोक्यावर घेतलेल्या तुळशी यादेखील आकर्षणाचा विषय ठरल्या गावामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आरतीचे देखील आयोजन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थी व नागरिकांना प्रसाद वाटप करण्यात आला  जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका पल्लवी शानबाग व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले तसेच यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते संस्थेच्या चेअरमन सुनिता हरगुडे, सचिव नेहा चव्हाण, सूत्रसंचालन  विजयश्री गोरे, आणि  अश्विनी सावंत  यांनी केले तसेच वारकरी संप्रदायातील वामन सोपान दरेकर व अनिल विठ्ठल सावंत यांनी मुलांना भजन पसायदान त्याबरोबर संतांचे विचार समजावून सांगितले