जांबूत येथील घरकुल घोटाळा प्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक तथा विद्यमान विस्तार अधिकारी पं. स बारामती यांना कारणे दाखवा नोटीस
ग्रामीण रोजगार हमी योजना नमुना नं ५ वरुन रक्कम रुपये २८, ३१५/- अदा केल्याचे दिसून येत आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सदर प्रकरणी सादर केलेल्या अहवालानुसार सदरील रेकॉर्ड २० वर्षापुर्वीचे असल्यामुळे संबधित रेकॉर्ड नाशपात्र असून ते रेकॉर्ड मुख्य कचेरी मार्फत पंम्पींग केले असल्याने उपलब्ध होऊ शकले नाही. त्याप्रमाणे घरकुल निधी संबधित लाभार्थीच्या खातेवर जमा झाला किंवा कसे याबाबत कागदपत्रां अभावी खात्री करता आली नाही. परंतु सदरील पुर्ण झालेल्या घरकुलाची नोंद जांबूत ग्रामपंचायत दप्तरी नं.न.८ इमारती व जमीनीची नोंदवहीला नोंदविणे आवश्यक होते. परंतु अहवालानुसार सदरील नोंद झालेली नसल्याचे दिसुन येत असल्यामुळे सदर लाभार्थीस योजनेचा लाभ मिळाला किंवा कसे? याबाबत खात्री करता आलेली नाही.
सदर प्रकरणाचा खुलासा सात दिवसांचे आत कार्यालयास सादर करावा. विहीत मुदतीत व समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यास तत्कालीन ग्रामविकास अधिकारी तथा सध्याचे विस्तार अधिकारी पंचायत समिती बारामती यांच्या विरुध्द शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करणेत येईल अशी कारणे दाखवा नोटीस गटविकास अधिकारी वर्ग १ पंचायत समिती शिरूर यांनी बजावलेली आहे.
