सदर माहितीची खातरजमा करुन वपोनि रजनीश निर्मल यांना कळविले असता त्यांनी सदर इसमास ताब्यात घेऊन त्याचेकडे चौकशी करणेबाबत आदेशित केले असता सदर इसमास ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव पवन संतोष भारती वय २० वर्षे रा. तरवडे वस्ती, मोहम्मदवाडी, पुणे असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात एक लोखंडी कोयता मिळून आल्याने त्याचेविरुद्ध वानवडी पोलीस स्टेशन गु र नं – 1237/ 2023 भा हत्यारबंदी कायदा कलम ४(२५) सह म पो का कलम ३७(१)(३),१३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी रामनाथ पोकळे (अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे), अमोल झेंडे (पोलीस उप आयुक्त गुन्हे), सतीश गोवेकर (सहा.पोलीस आयुक्त सो गुन्हे 2) या वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, पोलीस उप निरिक्षक सुरेश जायभाय, पो हवा मच्छिंद्र वाळके,पो ना विठ्ठल खेडकर, नितीन मुंढे, संभाजी सकटे, रमेश मेमाने, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार या पथकाने केलेली आहे.
