March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
              कोरेगाव भीमा – वढू बुद्रुक (तालुका शिरूर) या तीन किलोमीटरच्या महत्त्वाच्या रस्त्यावर रस्त्याच्या कामांमध्ये अडथळा येत असलेला तसेच अपघाताला निमंत्रण असणारा विद्युत खांब महावितरण च्या कृपेने उभा आहे, पीडब्ल्यूडी च्या अनेक पत्रांना महावितरण कडून केराची टोपली,
           

    अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ वढू बुद्रुक ला जोडणारा महत्त्वाचा मार्ग, या मार्गाचे काम गेल्या काही महिन्यापासून राज्य शासनाकडून चालू आहे, वढु बुद्रुक आणि कोरेगाव भीमा च्या बाजूने रस्त्याचे काम उरकले आहे, परंतु मध्यंतरीचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी विद्युत खांबाचा अडथळा होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अनेकदा महावितरण कंपनीशी पत्रव्यवहार करून महावितरण खात्याकडून जाणून-बुजून हा खांब हटवण्याचे साठी रगीलपणा होत आहे, त्यामुळे रस्त्याच्या कामामध्ये अडथळा येत असून, रस्त्याच्या मधोमध असलेल्या या अति दाबाच्या विद्युत खांबामुळे नागरिकांकडून मोठ्या अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे, तातडीने हा खांब हटवावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे,

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता रणजीत धाइंगडे यांनी सांगितले की, संबंधित विद्युत खांब हटवण्यासाठी अनेकदा महावितरणशी पत्र व्यवहार केला आहे, परंतु तरीदेखील हा विद्युत खांब हटवला जात नाही, महावितरणाने आम्हाला परवानगी द्यावी तसेच काही काळासाठी विद्युत प्रवाह बंद करावा, सहकार्यातून आम्ही खांब रस्त्यातून बाहेर काढू परंतु महावितरण कडून कुठलेच ठोस पावले उचलले जात नाही,
महावितरण चे कार्यकारी अभियंता शिक्रापूर नितीन महाजन यांनी सांगितले की, पीडब्ल्यूडी ने बाकीचे सर्व खांब काढण्याचे काम केले आहे, त्यामुळे हा खांब काढण्याची जबाबदारी त्यांची आहे, पुढे बरेचशे गावे या मुख्य लाईन वर अवलंबून असून जास्त वेळ विद्युत पुरवठा बंद ठेवता येत नाही, पीडब्ल्यूडी खर्च करून नवीन लाईन टाकावी, त्यानंतर थोडा वेळ विद्युत पुरवठा बंद करून संबंधित खांब काढून टाकावा,