दातृत्वात नेहमीच अग्रेसर बबनदादा व चेअरमन संतोष शिंदे परीवाराने ११ हजार, मोहन भागाजी ननवरे ५००० , सरपंच चंद्रभागा विठ्ठल खर्डे ५००० , अमोल रामदास पुंडे ३५०१ , रोहिदास ढगे २५०० , नवनाथ निचीत २००० व संतोष सातकर आदी अनेक दात्यांनी यथाशक्ती हजार पाचशाची मदत केलेचे त्यांचे शहाजी दळवी व ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले . मोठ्या संख्येने रहिवाशांचे अतोनात नुकसान झालेने सगळी कडूनच आभाळ फाटलेने ते शिवण्यांचा जोडण्याचा त्याला थोडाफार टेकू देण्याचा प्रयत्न करावा असे कान्हूर मेसाई ग्रामस्थांनी दानशूर दात्यांना विनम्र आवाहन केले आहे . विद्याधाम हायस्कूलचे प्राचार्य अनिल शिंदे व सहकारी शिक्षक वृंदानी हायस्कूल प्रांगणात बोलवून आपदग्रस्त महिला व विद्यार्थ्यांना साहीत्य वाटप केल्याने त्यांचे हे काम परीसरात कौतुकास्पद असलेचे विचारशहाजी दळवी व ग्रामस्थांनी व्यक्त केले .

