आळंदी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर
या बाह्यवळण मार्गाचे दुतर्फा मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्या ने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. वाहन चालक, नागरिक यांना रहादारित नक मुठीत धरून पादचाऱ्यांना चालावे लागते. या मुळे नागरिकांत नाराजी आहे. तीर्थक्षेत्र आळंदी विकास आराखड्या अंतर्गत करण्यात आलेल्या बाह्यवळण मार्ग पुला जवळ धोकादायक वळण असून सदरचे वळण कमी करण्यासाठी रस्त्याचे रुंदी प्रमाणे पूला जवळ रस्ता विकसित करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
सदर ठिकाणचा कचरा तात्काळ स्वच्छता मोहीम रोबवून उचलण्याची मागणी जोर धरत आहे. पुलाचे दोन्ही बाजूला संरक्षक जाळी बसविण्याची आवश्यकता असून नुकत्याच बस ला झालेल्या अपघातात ७० मुलांचे प्राण प्रसंगावधान राखत घेतलेल्या दक्षते मुळे वाचले आहे. अद्याप दुर्घटने नंतर अद्याप ही त्या ठिकाणचे लोखंडी कठडे दुरुस्त करण्यात आले नसल्याने वाहन चालक नागरिक धोकादायक स्थितीत ये जा करीत आहे. या बाह्यवळण मार्गावर खड्यांचे साम्राज्य देखील असून खड्ड्यांमुळे वाहन चालविणे गैरसोयीचे होत आहे. पुलावर माती साचल्याने पावसाचे पाणी साचून रहात आहे.
