भोर प्रतिनिधी सुनिल साळवी
ग्लोबल वार्मिंग चा धोका वाढत असताना पृथ्वीवरचे झाड हे कमी होत असताना यांनी नवीन उपक्रम चालू केला आहे .50 झाडे लावण्यापासून 5 वर्षापूर्वी चालू केलेली प्रवास सुरुवात आज 1 हजार झाडे लावण्यापर्यंत पोचली आहे. तर ही तरुण पिढी करते काय ज्यावेळी त्यांना कामातून, शाळेचा अभ्यास पूर्ण करून मिळाल्या वेळ गावातील मंदिरांची साफसफाई करणे पिण्याच्या पाण्याच्या टाक्या साफ करणे, गावातील गटारे साफ करणे, व्यायाम करणे तालीम करणे असा त्यांचा नियमित दिनचर्या दिनक्रम ठरलेला. . गावातील वयस्कर वयोवृद्ध तरुण पिढीच्या मार्गदर्शन घेऊन प्रत्येक वर्षी समीर कदम आणि त्यांची युवा टीम आंब्याची कलम बांधणे .औषधी वनस्पतींच्या बिया शोधून काढणे. माती गोळा करणे माती पिशवीमध्ये भरणे त्याचा बी रोपण करणे. उगवलेल्या रोपाना पाणी देणे आणि ती झाडे माळरानावरती गावातल्या वनविभागाच्या हद्दीत लावणे.
