राज्यामध्ये तिथीप्रमाणे येणारी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना, कोरेगाव भीमा येथील शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारी शैक्षणिक संस्था अल अमीन एज्युकेशन अँड मेडिकल फाउंडेशन यांच्यावतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज तसेच शैक्षणिक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रमुख उपस्थितांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नासीर भाई शेख, सर सचिव झाहिद शेख, विशेष कार्यकारी अधिकारी अमीर इनामदार, प्राचार्य डॉक्टर ए एम शेख, सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी उपस्थित होते, यावेळी प्राचार्य शेख यांनी शिवजन्मोत्सव व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली, तसेच सर्वांनी एकमेकाला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या,

