सुनील भंडारे पाटील
भारताच्या इतिहासातील व राजकारणातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव सर्वत्र घेतले जाते, त्यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने बकोरी (तालुका हवेली) येथील वनराई मध्ये झाडे लावून अटलजींच्या आठवणींना उजाळा देण्यात आला,
भारत देशाच्या राजकारणातील एक ‘अटल’ व्यक्तिमत्व,भारतीय जनसंघ तसेच भारतीय जनता पक्षाचे संस्थापक,भारतमातेची अव्याहतपणे सेवा करणारे, कोट्यवधी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान,प्रेरणादायी कवी,लेखक,ओजस्वी वक़्ते दिवंगत पंतप्रधान, भारतरत्न ,श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपा युवा मोर्चा यांच्या वतीने बकोरी वनराई येथे वृक्षारोपण करण्यात आले, यावेळी वृक्षारोपणासाठी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष गणेशबाप्पु कुटे आणि जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष राहुल कुटे, सचिव विलासजी सातव, माहिती सेवा समिति अध्यक्ष चंद्रकांतजी वारघडे,युवा नेते चेतनजी राउत,जितेश पाटिल व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,
अटल बिहारी वाजपेयी यांनी हिंदुत्ववादी विचारांमधून भारतीय जनता पार्टीला एक चांगले वळण दिले, त्याचप्रमाणे त्यांच्या कविता देखील लोकसभेमध्ये चांगल्याच लोकांना आवडल्या, आजही भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचे काम आमच्यासारखे कार्यकर्ते करत आहेत, पक्षामध्ये काम करत असताना, वेळोवेळी त्यांची आठवण आम्हाला येते असे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश (बापू) कुटे यांनी सांगितले,
