March 30, 2026
लोणी काळभोर अनिकेत मुळीक
        उत्कृष्ठ कामकाज केलेल्या सहकारी विकास संस्थांचा ढाल देऊन गौरव करण्यात आला.पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक,मर्यादीत पुणे.या बँकेचे वार्षिक सर्वसाधारण सभा दि.३०/०९/२०२२ रोजी अल्पबचत भवन येथे पार पडली. सदर सभेमध्ये उत्कृष्ठ कामकाज केलेल्या सहकारी विकास संस्थांचा ढाल देऊन गौरव करण्यात आला,     

त्यामध्ये काळभैरवनाथ विविध कार्यकारी सोसयटी मर्या.लोणी काळभोर या संस्थेचे उत्कृष्ठ काम केल्या बद्दल राज्याचे माझी- उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजिदादा पवार यांच्या हस्ते  संस्थेचे चेअरमन – दिलीप काशिनाथ काळभोर , रविंद्र अमृत काळभोर ,प्रशांत दत्तात्रय काळभोर, पै.राहुल काळभोर, जयदीप दिलीप काळभोर,लोणी काळभोर शाखेचे विकास अधिकारी नंदकुमार साहेबराव भंडारी,संस्थेचे सचिव सुभाष रामचंद्र जवळकर,यांना संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.यावेळी हवेली तालुका बँकेचे संचालक .विकासनाना दांगट पाटील तसेच प्रविण शिंदे हे कार्यक्रमा वेळी उपस्थित होते.हि संस्था हवेलीचे  ज्येष्ठ नेते व बँकेचे माजी चेअरमन कै- अशोक काशिनाथ काळभोर यांनी सन २००० साली स्थापना केली.तेव्हापासून संस्थेचे  कामकाज उत्तम प्रकारे चालू आहे. असे चेअरमन दिलीप काळभोर यांनी सांगितले,