लोणी काळभोर चंद्रकांत दुंडे
यावेळी विश्वस्त केशव उमेश विद्वांस उपस्थित होते. देवस्थान तर्फे मंदिर प्रांगण आणि मंदिराबाहेर मांडव व पत्रा शेड घालण्यात आले होते, दर्शनबारी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि दर्पण ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या प्रमाणात शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान करण्याचे श्रेष्ठ कार्य केले.
दुपारी देवस्थान तर्फे भाविकांना उपवासाची खिचडी वाटण्यात आली. सायंकाळी चिंतामणी भजनी मंडळ यांचे साथीने ह.भ. प. शंकर महाराज फताळ यांचे सुभाष्य कीर्तन झाले, चंद्रोदयानंतर श्रींचा छबिना निघला त्यांनतर उपस्थित भाविकांना ग्रामस्थांतर्फे महाप्रसाद देण्यात आला. जास्त गर्दी होण्याची शक्यता असल्याने देवस्थान तर्फे जादा सुरक्षा व्यवस्था करण्यात केली होती. ग्रामपंचायती तर्फे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. देवस्थानचे विश्वस्त केशव उमेश विद्वांस लक्ष ठेवून होते.
