वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, कोल्हा,हत्ती, रान कुत्रे यांच्या हल्ल्यात मनुष्य हानी झाल्यास किंवा व्यक्ती मृत झाल्यास पंधरा लाख,गाय बैल म्हैस, साठ हजार रुपये,व्यक्ती कायम अपंग झाल्यास पाच लाख ,व्यक्ती गंभीर जखमी झाल्यास एक लाख पंचवीस हजार,व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास वीस हजार रुपये शासनाच्या वतीने लाभ मिळणार असल्याचे वनरक्षक सविता चव्हाण यांनी सांगितले. तसेच बिबट्या पासून संरक्षण कसे करावे याबद्दल माहिती देण्यात आली.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्या अरुणाताई घोडे, माजी ग्रामपंचायत सदस्या वंदनाताई खामकर, पोलीस पाटील शोभाताई मंदिलकर, सखाराम खोमणे,शंकर घोडे , तबाजी मंदिलकर , कुंडलिक जाधव, रोहिदास घोडे, योगेश हिलाळ, पोपट घोडे, भाऊसाहेब टेमकर,दादाभाऊ घोडे,नितीन थोरात, सनी गावडे,स्वप्नील चोरे,बाबू चोरे, बाळासाहेब खटाटे, माऊली रसाळ, पत्रकार प्रवीण गायकवाड,(( साहेबराव लोखंडे, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


