याल तर यारे मागे – आजी देईन पोटभरी – पुरे म्हणाल तोवरी या तुकाराम महाराजांचे अभंगावर कृष्ण चरीत्र लिला सांगतांना त्यांनी लहान मुलांना आवर्जुन किर्तन प्रवचनात मंदिरात आणावे , त्यांनी दंगा केला तरी चालेल कारण लहानपणीच मुलांना अध्यात्माची गोडी लागून सुसंस्कारीत पिढी बनेल . दही हंडी हभप कुहाडे महाराजांचे हस्ते फोडून सर्वाना गोपाळकाला वाटणेत आला .
फराळव महाप्रसाद वेदांत दतात्रय हरगुडे , संदिप भोसले , दिंडी मंडळाचे उपाध्यक्ष रामदास दरेकर व पमाजी हरगुडे यांचेतर्फे देणेत आला . माजी सरपंच दता हरगुडे यांनी सुत्रसंचलन केले . माजी सभापती आनंदराव हरगुडे , मा . चेअरमन गोरक्ष दरेकर व ग्रामस्थांचे हस्ते महाराजांचा व आळंदीकर गायक मंडळीचा सत्कार करणेत आला . आभार प्रदर्शन दिंडी मंडळाचे अध्यक्ष आदीनाथ हरगुडे यांनी केले . येथील भैरवनाथ मंदीरात कृष्ण जन्मोत्सवा निमीत हभप ज्ञानेश्वर महाराज यांचे किर्तन प्रसंगी मोठे संखेने भावीक उपस्थीत होते,



