सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
वाचनसंस्कृतीने सामाजीक उत्कर्ष होतो या जाणीवेतून एक बांधीलकी म्हणून जोगेश्वरी इंटरप्राईजेस नावे उद्योग व्यवसाय करणाऱ्या राजेंद्र बापुराव हरगुडे व सहकार्यांद्वारा ‘ यथार्थ गिता ‘ या ग्रंथाचे हभप तुकारामबुवा हरगुडे यांचे हस्ते हभप राजेंद्र महाराज गरुड, हभप विकास जाधव व हरीपाठ मंडळातील सर्व सदस्य व उपस्थितांना सणसवाडी येथे वाटप करणेत आले,
ग्रंथ हेच गुरु असून गितेतील तत्वज्ञान समाजा पर्यंत पोहचविण्याचा या उद्योजकांचा स्त्युत्य प्रयत्न आहे आणि गिता ही श्रीकृष्णाने फक्त अर्जुनास सांगितली नसून आख्या जगदुनियेतील मानवजातीस हे तत्वज्ञान सांगितले आहे, अर्जुन निमीतमात्र आहे. जसे दुध काढताना आधी वासरु सोडून पाजले जाते व गाईस पान्हा फुटताच वासरू आखडून बाजूला बांधतात व कळशीभर दूध काढून ते अनेकांना पुरविले जाते, तसेच हे तत्वज्ञान सर्वत्र प्रसारीत व्हावी अशी अपेक्षा आहे, असे हभप गरूड महाराजांनी आभार व्यक्त करताना विचार मांडले. हे ग्रंथ केसनंद आदी चार गावात वाटणेत आले आहेत.

