सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
सणसवाडी ता . शिरूर येथील २२ वर्षापुर्वी टाळेबंदी करून ५ हजार कामगारांचे भवितव्य धुळीला मिळवणाऱ्या इस्पात कंपनीचे व्यवहारांची चौकशी करून पिडीत कामगारांना न्याय मिळावा , अशी मागणीचे निवेदन कंपनी गेटवर राष्ट्वादी श्रमशक्ती महासंघ आयोजीत बैठकीत सरचिटणीस दिलीप देशमुख यांनी शिक्रापुर पो. स्टेशनचे पो. निरीक्षक आतकरी , पो ना . कारंडे, रासकर ,शिवणकर यांना दिले .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सदर निवेदन पाठविणेत आले असून इस्पात खरेदीदार कंपनी युरेनस सॉफ्टेक पार्क प्रा .लि चे प्रतिनिधींनी गेटवर येवून निवेदन स्विकारले नाही . सणसवाडीच्या सरपंच संगिता हरगुडे , रामदास दरेकर यांनाही इस्पातचे कामगारांनी निवेदन दिले .न्यायालयीन लढ्यात सुप्रिम कोर्टापर्यंतचे सर्व निकाल कामगारांचे बाजूने लागले . २०१५ ला कामगारांना ६कोटी देणेचा प्रस्ताव होता . पण पुढे कंपनीने दिवाळखोरी जाहीर करत ४ कोटीही दिले नाहीत . व कंपनीची विक्री २०० कोटीं ऐवजी १०४ दावली . त्यातच लाखाचे दरम्यान काही कामगारांना त्यांचे खातेवर बेकायदेशिररित्या पाठवून हिशेब देण्याचा देखावा केला , तो कामगारांना मान्य नाही .
कलकता स्थित NCLT कोर्टालाही कं . मैनेजमेंटने चुकीची माहीती दिल्याने कामगारांचे भविष्याचा विचार न करता विरोधी निकाल दिलेने आता कामगारांनी न्यायालयीन लढा व गेटवर आंदोलनाचा मार्ग स्विकारला असुन पोलिस प्रशासनाला सहकार्या साठी निवेदन दिले आहे .
यावेळी सचिन भंडारे , विक्रम दरेकर, प्रविण दरेकर , उद्योजक नवनाथ हरगुडे , नवनाथ दरेकर , सोसायटीचे संचालक भैरु दरेकर , सुदाम यादव , महासंघाचे अध्यक्ष रामा वांद्रे , चिटणिस दिलीप देशमुख, प्रकाश पाटील , विजय रणधिर , भगवान सरक , अशोक देवरे , दता म्हस्के , दिलीप म्हस्के, शरद म्हस्के , अण्णा श्री खंडे, संजय विर , नरहरी काळदाते , राजू स्वामी , विजय निंबाळकर , विद्याधर कुंटे, भागवत जगदाळे, विलास पाटील, हेमंत राठोड , शिवाजी साळुंके, भगवान सपकाळ , नामदेव महाजन आदी शंभरावर कामगार व ग्रामस्थ उपस्थीत होते
.


