नेते पुढारी इकडे लक्ष देत नाहीत व पोलीस प्रशासनाचे कुठे सगळीकडे लक्ष असणार ? गुटका खाणारे रस्ता चौकात तोंड वर करून पुड्या रिचवतात व कुठेही थुंकतात . ज्याने दाढी वाढविली विविध कार्यक्रमात नाचत होते तेच रस्त्यात नशेत बेभान होऊन पडलेले पाहून कुणाला त्याचे सोयरसुतक नाही,
गावात वर्षाला ४डझनावर किर्तने प्रवचने होतात , काही पुढारी दिखाव्यासाठी सहभागी होतात पण ही सामाजीक समस्या , प्रदुषण , व्यसनामुळे होणारी बरबादी लुटमार रोकण्यासाठी कुणी पुढाकार घेत नाहीत . राळेगण सिद्धी हिवरे बझार आदर्श गावे बनली ते अण्णा हजारे व पोपटराव पवारांनी व्यसनमुक्त गाव केल्याने . पण इथे फक्त पोपटपंछी चालूय समाज कारण नाही . तरी या प्रकरणांवर शासन पुढारी ग्रामस्थ कुणी निराकरणासाठी प्रयत्नरत होतील काय अशी नागरीकांची अपेक्षा आशा आहे .


