यावेळी दिव्यांग कल्याणकारी संस्था पदाधिकारी उपस्थित होते. श्रीमती एलिस जोसेफ मसीह, वय वर्ष ५० त्या मूळ उत्तरप्रदेश मधील रा. मरियमपूर, पोस्ट-लालपूर, ता. बिलासपुर, जिल्हा. रामपूर च्या आहेत.
श्रीमती एलिस यांचे पाचवी पर्यंत शिक्षण झालेले असून २००५ पासून त्या दगडखाण क्षेत्रातील निराधार, निराश्रित मुलांसाठी संतुलन संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या संतुलन निवासी पाषाण शाळेतील मुलां-मुलीचे जेवण बनविण्याचे काम करत आहेत. “जोपर्यंत हात पाय चालतील तोपर्यंत मुलांना जेवण बनवणार” असा त्यांचा निर्धार आहे. एलिस यांच्या पुरस्कारातील निवडीबद्दल संतुलन संस्थेचे संस्थापक ऍड. बी.एम.रेगे संचालिका ऍड. पल्लवी रेगे यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. संतुलन संस्था, संतुलन पाषाण शाळा व दगडखाण कामगार विकास परिषद यांच्या वतीने त्यांना शुभेच्या देण्यात आल्या.


