March 30, 2026
रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
         संकष्टी चतुर्थी व स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून  पहाटे ५ वाजता अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान मध्ये ध्वजारोहण करण्यात आले.   

संकष्ट चतुर्थी निमित्त भाविकांसाठी उत्तम प्रकारे जलद दर्शन व्यवस्था, खिचडी प्रसाद, पिण्याचे पाणी तसेच श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट व अष्टविनायक ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते इत्यादी सुविधा देवस्थान ट्रस्ट तर्फे देण्यात आल्या.

  सोमवार दि . १५ ऑगस्ट २०२२ आज  संकष्ट चतुर्थी निमित्त पहाटे अभिषेक, तसेच  १२ वाजता महापूजा व महानैवेद्य देवस्थान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आला. संकष्टी चतुर्थी निमित्त प्रगतशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांच्या वतीने मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.
     यावेळी देवस्थान चे विश्वस्त मंडळ डॉ. संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर, अँड. विजयराज दरेकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, हिशोबाणीस संतोष रणपिसे पुजारी प्रसाद कुलकर्णी , मकरंद कुलकर्णी व देवस्थान कर्मचारी, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक मा. बलवंत मांडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.