March 30, 2026
सुनील भंडारे पाटील 
                  संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेले शिरूर हवेली मतदारसंघ, या मतदारसंघात ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांचा दणदणीत विजय झाला असून त्यांना ७४६८६ एवढ्या मताधिक्याने विजय मिळाला आहे, हवेली मध्ये राजकीय दृष्ट्या पहिल्यांदाच आमदारकी मिळाल्याने लोकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे, 

                    या निवडणुकीसाठी एकूण 11 उमेदवार रिंगणात होते परंतु महायुतीच्या वतीने माऊली आबा कटके तसेच महाविकास आघाडीच्या वतीने आमदार अशोक बापू पवार यांच्यात तुल्यबळ अशी अटीतटीची समोरासमोर लढत होऊन अखेर पवार यांचा चांगल्या मतांनी पराभव करत माऊली आबा कटके यांनी विजय मिळवला आहे, 

                      शिरूर हवेली मतदारसंघात विधानसभेचा उमेदवार निवडण्यासाठी महायुतीला खूप कष्ट घ्यावे लागले, आमदारकीसाठी या मतदारसंघात पूर्वी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आल्याने, तसेच अशोक बापू पवार आहे त्या पक्षात स्थिर असल्याने, अजित दादा पवार यांनी “कसा आमदार होतो तेच पाहतो ” असे वक्तव्य केले होते, त्यामुळे अजित दादा या जागेसाठी आग्रही होते, त्यांनी जागा मिळवल्यानंतर लोकसभेमधील आयात उमेदवार आढळराव पाटील यांच्या अपयशामुळे उमेदवारी देण्यात अडचण निर्माण झाली होती, अखेर माऊली आबा कटके यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला रामराम ठोकत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, तसेच उमेदवारी मिळवून निवडणूक लढवली,
                        संपूर्ण राज्यात बहुचर्चित असलेल् मतदारसंघात अखेर अजित दादांनी आपली चाणक्य बुद्धी वापरत जागा जिंकून आणली याविषयीची चर्चा सध्या नागरिकांमध्ये जोरदार चालू आहे, विरुद्ध उमेदवार वरील जनतेची नाराजी, जय महाकाल कृपा, हवेली तालुक्याचा स्वाभिमान, घोडगंगा सहकारी साखर कारखाना, त्याचप्रमाणे आमदारकी साठी नवीन चेहरा , महायुतीची लाडकी बहीण योजना या मुद्द्यावर अखेर माऊली आबा कटके यांचा तब्बल रेकॉर्ड ब्रेक करत ७४६८६ मतांनी विजय झाला आहे,