March 30, 2026
गुनाट प्रतिनिधी : एकनाथ थोरात 
         गुनाट( ता.शिरूर) येथील बिबट्याने थेट मेंढराच्या कळपावरच घातला घाला (दि.१२) रोजी सायं. ६ च्या सुमारास पुन्हा शिरूर तालुक्यातील गुनाट गावांमध्ये कोळपेवाडी या ठिकाणी मेंढ्याच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला यामध्ये एक मेंढी ठार झाली.                  

सायंकाळच्या सहाच्या सुमारास मेंढ्याचा कळप घेऊन घरी जात असताना अचानक बिबट्याने कळपावर हल्ला केला या हल्ल्यात एक मेंढी ठार झाली असून दोन ते तीन शेळ्या अद्याप गायब आहे असे शेतकरी भानुदास दत्तू पारखे म्हणाले ही घटना घडल्यानंतर वनसेवक नवनाथ गांधले यांनी त्वरित पंचनामा केला आणि वनविभागामार्फत आम्ही पिंजरा लावू असे सांगण्यात आले त्यावेळी माजी सरपंच गणेश कोळपे, उपसरपंच पांडुरंग गव्हाणे उपस्थित होते, गुनाट गावात बागायत क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतकरी रात्रंदिवस शेतात असतात त्यामुळे वन विभागाने तत्काळ पिंजरे लावून बिबट्याला पकडण्याची गरज आहे अशी मागणी माजी सरपंच गणेश कोळपे व उपसरपंच पांडुरंग गव्हाणे यांनी वनविभाग अधिकाऱ्यांना केली आहे.