रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
कारेगाव (ता.शिरूर) नवले मळा येथे शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी यांनी विहिरीच्या राहटाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे,
जितेंद्र उर्फ हरिभाऊ केशव मांडगे (वय ३४ वर्षे रा. पिंपरी ता. पारनेर जि. अहमदनगर ) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. सदानंद तान्हाजी नवले( वय 31 रा. नवलेमळा, कारेगाव ता. शिरूर )यांनी खबर दिली आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे शिक्रापूर ता शिरूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस शिपाई जितेंद्र केशव मांडगे यांनी बुधवारी सायंकाळच्या सुमारास कारेगाव ता. शिरूर जवळील नवले मळा येथील विहिरीच्या राहटाच्या दोरी गळ्यात अडकवून विहिरीत उडी मारत गळफास घेतल्याची घटना घडली, मांडगे यांनी गळफास घेण्यापूर्वी नातेवाईकाला फोन करून मी आत्महत्या करत असल्याबाबतचे सांगून गळफास घेतला, काही वेळातच सदर ठिकाणी युवक गेले असता त्यांना जितेंद्र मांडगे यांनी विहिरीच्या रहाटस गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले दरम्यान काही नागरिकांनी त्यांना उपचारासाठी शिरूर येथील माणिकचंद हॉस्पिटलमध्ये नेले असतात तेथील डॉक्टरांनी जितेंद्र उर्फ हरिभाऊ केशव मांडगे (वय ३४ वर्षे रा. पिंपरी ता. पारनेर जि. अहमदनगर ) उपचारापूर्वी मृत् झाल्याचे घोषित केले. तर जितेंद्र मांडगे यांनी नैराश्यातून गळफास घेतला असल्याचे बोलले जात असून पोलीस वर्तुळात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे, सदर घटनेबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपासा करिता हा गुन्हा रांजणगाव पोलीसात वर्ग करण्यात आला आहे.

