March 30, 2026
रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
        शासनाचे सर्व नियम पाळून गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी यांनी केले.    

रांजणगाव एमआयडीसी  पोलीस स्टेशन येथे रांजणगाव पोलीस  स्टेशन परिसरातील विविध गावचे पोलीस पाटील ,  तंटामुक्ती अध्यक्ष व गणेश मंडळांचे पदाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

  कोरोना महामारी नंतर चालू वर्षी प्रथमच मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात गणेश उत्सव साजरा होणार आहे.  त्यामुळे गणेश मंडळांनी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून अतिशय साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन यशवंत गवारी  यांनी केले.  याप्रसंगी रांजणगाव एमआयडीसी  पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे व  पोलीस कर्मचारी उपस्थित होते.