गुनाट प्रतिनिधी : एकनाथ थोरात
निर्भया पथक शिरूर पोलीस स्टेशन ,पुणे ग्रामीण पोलीस यांनी आलेगाव पागा येथील भैरवनाथ हायस्कुल च्या ५ वि ते ९ च्या शिरूर इथे सहली निमित्त आलेल्या मुला मुलींची भेट घेऊन तुम्हाला शाळेत येता जाताना कोणी त्रास देत का याबाबत सवांद साधला .
शाळेतील मुलींशी सवांद साधला, शाळेत काही समस्या आहेत का याबाबत मुलींची निर्भया पथकाने चौकशी केली.तसेच मुलींच्या सुरक्षे साठी शाळेत तक्रार पेटी बसविणे,याबाबत निर्भया पथकाचे पोलीस अंमलदार राजेंद्र गोपाळे, यांनी भैरवनाथ शाळेचे शिक्षक दिलीप वाळके सर यांना सूचना केल्या आहेत.
तसेच यापुढेही पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व शाळा ,कॉलेज यांना निर्भया पथकाच्या माध्यमातून भेटी देऊन मुलींना मार्गदर्शन केले जाणार आहे.

