March 30, 2026
दहिवडी प्रतिनिधी 
     तळेगाव ढमढेरे (ता शिरूर )येथील समाज भूषण संभाजीराव भुजबळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या (टाकळी भिमा) येथील पालक मेळाव्यात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्ते बरोबर पाल्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे मत ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठांण व संशोधन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव भुजबळ यांनी व्यक्त केले.

 टाकळी भीमा येथील पालकांचा स्नेह मेळावा मंगळवार दिनांक 20/12/2022 रोजी सीतामाई महिला शिक्षण मंडळाची स्थापना करून पदाधिकारी निवड करण्यात आली यावेळी सीतामाई महिला शिक्षण मंडळाच्या फलकाचे *उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनावरण* करण्यात आले या मंडळाच्या माध्यमातून येथील सर्व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक,आरोग्य, विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी, समस्या, मूलभूत सोयीसुविधा व इतर सर्व बाबतीत या महिला पालक लक्ष घालणार असून या पुढील काळात शाळा विद्यार्थी पालक व शिक्षक हे एकत्र येण्यास विद्यार्थी हित जोपासण्याचे काम करतील असे या कार्यक्रमात ठरले. शिक्षण मंडळ स्थापन करण्याचे उद्दिष्ट मुख्याध्यापक  बाळासाहेब चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले तसेच या  कार्यकारणी मधील अध्यक्षा राजश्री लक्ष्मण दोरगे यांनी आपले मनोगत व्यक्त करून सहकार्य करण्याचे व सर्व विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे विविध प्रश्न  प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहू अशी ग्वाही दिली. याप्रसंगी या नवीन स्थापन केलेल्या शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी महिला, सर्व पुरुष पालक व विद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री कापरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरेखा डोईफोडे यांनी केले.