परतीच्या मुसळधार पावसाने थैमान मांडले असून या पावसामुळे आता फायदा मात्र कमी असून जास्त नुकसान होऊ लागले आहे, कोरेगाव भीमा परिसरातील वढू बुद्रुक, आपटी, वाजेवाडी, मांजरेवाडी, पिंपळे जगताप, सणसवाडी, दरेकरवाडी, धानोरे, डिग्रज वाडी, पेरणे, लोणीकंद, वडू खुर्द, डोंगरगाव, पिंपरी सांडस, वाडेबोल्हाई, तुळापूर व आसपासच्या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिके उध्वस्त झाली आहेत, त्याचप्रमाणे सपाट जमिनीमध्ये खोंगळ पडत आहे, रस्ते वाहून जात आहेत, दरवर्षी पेक्षा या वर्षी जास्तच पाऊस पडला आहे,
आज सायंकाळी झालेल्या पावसाचे ढगफुटी सारखे उग्ररूप होते, विजेचा कडकडाट खूपच तीव्र होता, विजेच्या आवाजाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते, या भागात चार वेळा विजेचा मोठा कडकडाट झाला,तसेच अति मुसळधार पावसामुळे ओढ्या नाल्यांना गच्च भरून पूर आला होता, त्यामुळे आसपासच्या गावांचा संपर्क तुटला होता,



