March 30, 2026
सणसवाडी प्रतिनिधी 
        महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे ने आयोजित केलेल्या सन २०२१/२२मधील शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला. यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसेवाडी( सणसवाडी ) चे पूर्व उच्च प्राथमिक  परीक्षा ( इयत्ता पाचवी) चे १२ व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इयत्ता आठवी ) चे १३  असे २५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले तसेच इयत्ता आठवी ची भाग्यश्री काळे ही विद्यार्थीनी राज्य गुणवत्ता यादीत चौथी आल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक संतोष गोसावी यांनी दिली.  

   

इयत्ता पाचवीतील यशस्वी विद्यार्थ्यांची नावे व कंसात गुण पुढीलप्रमाणे:
समर्थ संजय काळे(२८०) ,अमन प्रदीप चोपडे (२७८),अनुष्का पांडुरंग अंधारे (२७६), धनश्री शेषराव बारापात्रे
(२७६) ईश्वरी अमोल दरेकर(२७४)
झरीन नासीर सय्यद(२७४)आर्यन गणेश दरेकर (२७२)शुभनित सतिश डांगे (२७२)समृद्धी लिंबराज मातोळे (२५२)पौर्णिमा शंकर गुंड (२५२) पूर्वा प्रल्हाद नायकल (२५२) हिमांशी किरण पाटील (२४८)

तसेच इयत्ता आठवीतील यशस्वी विद्यार्थी व कंसात गुण पुढीलप्रमाणे :

भाग्यश्री योगेश काळे (२७२) अंकीता अशोक जडे (२४६) योगेश मोहन काशिद (२४६) कार्तिक शशिकांत चांगुलपाई( २३८)अपेक्षा जगन्नाथ गव्हाणे (२३४)  दिपाली मसू ओव्हाळ (२३२)बालाजी मलेश भंडारे (२३०) निकीता संतोष जाधव (२२८) आर्या सचिन  रोडे (२१६)पद्मावती मलेश भंडारे (२१४)पायल आण्णासाहेब देशमुख (१९६) धनश्री धनराज जाधव (१९६)  महेश मोहन काशिद(१८८)
                          इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना महिराज इनामदार , वर्षाराणी दहिफळे यांनी तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना भाऊसाहेब उचाळे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्याध्यापक संतोष गोसावी , केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, विस्तार अधिकारी वंदना शिंदे , गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर तसेच सणसवाडी गावचे सरपंच संगिता नवनाथ हरगुडे , उपसरपंच दत्तात्रय नामदेव हरगुडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर हरगुडे, उपाध्यक्ष अमोल दरेकर आदींनी अभिनंदन केले.