सुनील भंडारे पाटील
वाघोली (तालुका हवेली) गावचे माजी उपसरपंच शांताराम बापू कटके, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष सोमनाथ आव्हाळे, देवराम दादा तांबे माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चनाताई कटके पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष गणेश सातव अनिल शेठ आव्हाळे गणेश शेठ हरगुडे अबिद भाई शेख गुलाब सातव पाटील नारायण मोरे मोहन हरगुडे प्रकाश हरगुडे संपत जगताप करण थोरात, सुषमा जोर्वे कुंदा डफळ रूपाली सातव ज्योती थोरात राणीताई आव्हाळे, यावेळी उपस्थित होते,
वाघोली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने फटाकडे वाजत मोठा उत्साह
महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निकाल दिला आहे.
अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह बहाल करण्यात आलं आहे. राज्यसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
वाघोली गावचे माजी उपसरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शांताराम कटके याच्या सह वाघोली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या येथे मोठा जल्लोष साजरा करण्यात आला एकमेकांना पेढे भरवत घोषणेचा जयजयकार केला,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तथा माजी उपसरपंच शांताराम कटके म्हणाले की, उशिरा का होईना अखेर सत्याचाच विजय झाला, अजित दादांच्या नेतृत्वाखाली जसा विकास होत गेला, तसाच पक्ष देखील त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात नंबर वन चा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.प्रतीक शिवरकर मुकेश बेंडावले ज्ञानेश्वर घायतडक प्रणव महाजन मोहन सातव चंद्रकांत गाडोते मोनिका हिंगे पूजा मिश्रा सुजित भगत आदित्य केकान गोरख सातव तसेच यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते,
