March 30, 2026
राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी सुनील भंडारे पाटील, पश्चिम महा.पुणे विभाग व जिल्हा, तालुकास्तरीय नूतन कार्यकारणी निवडी जाहीर

 पुणे प्रतिनिधी

              राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र,पुणे विभागीय,पुणे जिल्हा तसेच तालुका निहाय नूतन कार्यकारणी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या, त्यामध्ये पुणे जिल्हाध्यक्षपदी सुनील भंडारे पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली,
             राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय संस्थापक अध्यक्ष, आधारस्तंभ, मार्गदर्शक, आदरणीय कुलथे साहेब यांनी स्वतः सर्व निवडी जाहीर केल्या त्या पुढील प्रमाणे, सुनील भंडारे पाटील (पुणे जिल्हाध्यक्ष),विजयराव लोखंडे (पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष), नितीन करडे (पु,वि,अध्यक्ष),
संभाजी चौधरी ( पु,वि,मुख्य संघटक), साहेबराव आव्हाळे (पु, वि,मुख्य सचिव), गौतम पिसे ( पुणे वि, मुख्य कार्याध्यक्ष), गजानन गव्हाणे (पु,वि,उपाध्यक्ष),अशोक बानगुडे (पुणे महानगराध्यक्ष),विजय थोरात (पु,जि,उपाध्यक्ष), गौतम लोखंडे (पु,जि, उपाध्यक्ष),शंकर पाबळे (पु,जि,कार्याध्यक्ष),ज्ञानेश्वर पाटेकर( पु,जि,महासचिव),प्रीती पाठक ( पु,जि, संपर्कप्रमुख),विजय हाडवळे (पु,जि,प्रसिद्धी प्रमुख), प्रमोद कुतवळ ( पु,जि,मुख्य संघटक), शरद टेमगिरे ( पु,जि,संपर्कप्रमुख),पोपटराव मांजरे (हवेली तालुकाध्यक्ष),एकनाथ थोरात (शिरूर तालुकाध्यक्ष), अशा निवडी जाहिरात करण्यात आले असून, राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे,

                केंद्रीय संस्थापक अध्यक्ष मधुसूदनजी कुलथे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला,यावेळी पुणे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यामधून पत्रकार उपस्थित होते,या प्रसंगी अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन झाले,

             कुलथे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, नवनिर्वाचित पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील भंडारे पाटील हे एक अत्यंत अनुभवी, हुशार, मनमिळाऊ नेतृत्व संघटनेला लाभले असून त्यांच्याकडून पत्रकारांसाठी चांगली कामे होणार आहेत, पुणे जिल्ह्यामध्ये संघटनेचे काम चांगले चालले आहे, पत्रकारांसाठी पत्रकार भवन,शासन दरबारी पत्रकारांची नोंद,तसेच पत्रकारांची एक पतसंस्था स्थापन करणार असल्याचे त्यांनी सांगितले, संघटनेत काम करत असताना प्रत्येकाने प्रोटोकॉल पाळावा, तसेच पद हे फक्त नामधारी नसून एक जबाबदारी आहे, प्रत्येकाने संघटना वाढीसाठी प्रयत्न करायचे आहे असेही त्यांनी पुढे सांगितले,

            पुणे जिल्हाध्यक्ष सुनील भंडारे पाटील यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यातील पत्रकारांच्या अडचणी पाहता, कुलथे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार विजय लोखंडे यांच्या सहकार्यातून चार वर्षांपूर्वी राज्य मराठी पत्रकार परिषदेचे एक छोटेशे रोपटे लावले होते, त्याचा आता वटवृक्ष झाला असून पत्रकारांच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तसेच मदत करण्यासाठी माझी पूर्वीपासून तळमळ आहे, जिल्ह्यामध्ये कोणाला काही अडचण आल्यास तातडीने माझ्याशी संपर्क साधावा, यापूर्वी दहा ते बारा वर्षे प्रिंट मीडियाला काम केले असून अडीअडचणी आल्यामुळे मी स्वतःचे भरारी न्युज हे  माध्यम काढले आहे, पत्रकारिता ज्वलंत ठेवण्यासाठी तुम्ही या माध्यमात काम करू शकता,