सुनील भंडारे पाटील
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्या महाराष्ट्र राज्यात हिंदुत्वाची मोठी लाट उसळून ताकद दिसली आहे, राज्यात कायम हिंदुत्वाच्या विरोधात काम करणाऱ्या महाविकास आघाडीला मोठा झटका देत घरी पाठवण्याचे काम जनतेने केले असून अखेर जिंकण्याचा इतिहास घडला आहे,
विधानसभेच्या एकूण 288 जागांपैकी तब्बल 233 जागा जिंकून महायुतीच्या सरकारने पुन्हा एकदा विधानसभेवर भगवा फडकवला आहे, लोकांना भावनिक करून सत्ता भोगणाऱ्या तसेच हिंदुत्वाला बदनाम करत स्वतःची पोळी भाजणाऱ्या महाविकास आघाडीला आता कायमचा घरचा रस्ता जनतेने दाखवला आहे, यापूर्वीच्या आठवणीतील विधानसभा निवडणूक मध्ये अशा स्वरूपाचा निकाल कधीच पाहायला मिळाला नव्हता,
राज्यात पुन्हा एकदा परफेक्ट नियोजन असणाऱ्या त्रिदेव म्हणजे देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजित दादा पवार यांनी चाणक्य नीति चा वापर करत विरोधकांना चारी मुंड्या चीट करत राजकीय वर्तुळात पुरते पाणी पाजले आहे, विरोधकांचा सुपडा साफ करत विरोधी पक्षनेता म्हणून जागा देखील शिल्लक ठेवली नाही,
विरोधकांना आता कुठलाच चर्चेचा मुद्दा शिल्लक नसल्याने ईव्हीएम वर खापर फोडण्याचे काम महाविकास आघाडीच्या निष्ठावंतांनी, अंध भक्तांनी चालू केले आहे, परंतु ही बाब साफ चुकीची असून लोकसभेच्या निकालावेळी हा प्रश्न का उपस्थित झाला नाही, म्हणजे यावरून फायदा झाला की चांगले, तोटा झाला की खापर फोडण्याचे काम चालू असे स्पष्ट होत असून अशा चर्चेंना अजिबात स्थान नाही, एकंदरीत राज्यात हिंदू आता एकवटला असून मोठ्या ताकतीने विजय संपादन करून विधानसभेवर भगवा फडकला आहे,
