सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
पंगतीत एका वाढीची अपेक्षा म्हणजे भोजनाची पुर्णता नाही . काल्याचे महाप्रसादाविन सप्ताहाची सांगता होत नाही . तसे आपल्या लोकशाहीतील लोकसभेच्या विधानसभेच्या अधिवेशनाची गोंधळात सांगता झाल्यास जनतेच्या हिताचे ठराव तसेच बाकी ठेवून गोंधळ घालत आमदार खासदारांनी अधिवेशन गुंडाळले तर ती अधिवेशनाची पुर्णता वा सफलता ठरत नाही , असे विचार हभप पांडूरंग महाराज घुले यांनी मिडगुलवाडी येथील काल्याचे किर्तन सेवेत मांडले,
‘ करीती नामाचे चिंतन – घडे कान्होबाचे ध्यान ‘ , या तुकाराम महाराजांचे अभंगावर बोलताना त्यांनी श्रीकृष्णाचे गोपाळावरील प्रेमापोटी काला करून त्यांचे उष्टे खात भक्तांचे कर्ज फेडण्याच्या भावनेने गोपाळकाला केल्याचे सांगीतले .
या अखंड हरीनाम सप्ताहात हभप दता माशेर (आमदाबाद ) , हनुमंत पोखरकर ( वडगावपिर ) , सुभाष महाराज लबडे ( जारकरवाडी ) , विकास महाराज हागवणे ( गिरवली ) विठ्ठल महाराज कापसे (आळंदी), नवनाथ महाराज माशेरे ( आमदाबाद ), विष्णु महाराज केंद्रे (आळंदी ) व पांडुरग महाराज घुले यांची किर्तनसेवा झाली . पहाटे ४ते ६ काकडा भजन , सकाळी ८ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण , सायंकाळी ५ ते ६ हरीपाठ , रात्री ७ ते ९ हरीकिर्तन , त्यांनंतर ९ते १० संपुर्ण गावास एकत्रीत भोजन , रात्री १० नंतर हरीजागर व अखंड विनाप्रहर असा नित्य दैनंदिन कार्यक्रम होता . दररोज गटागटाने महाभोजनाचे किर्तनानंतर आयोजन असलेने घरोघर चे आबालवृद्ध व ज्यांना अध्यात्माचे संस्काराची खरी गरज आहे ती लहान मुलं व युवापिढी हजर होती . हभप पोपट महाराज यांनी या हरीनाम सप्ताहात परीश्रम घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले . माजी सरपंच सुनिल मिडगुले , कैलासनाना मिडगुले, हरीभाऊ मिडगुले व हभप सुदाम महाराज मिडगुले व ग्रामस्थांनी हभप घुले महाराज व आळंदीकर गायक व वारकऱ्यांचा सन्न्मान केला . महाप्रासादाने हरीनाम सप्ताहाची सांगता झाली .

