संस्थेतील मुलांनी सर्वधर्म प्रार्थनेने व तबला वादनाच्या अविष्काराने सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधानाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर माहेर केंदूर या शाखेतील मुलांनी प्रार्थना डान्स केला. आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे स्नेहालय फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनी आपल्या मनोगत मध्ये माहेर संस्थेचे व सि. लुसी कुरियन यांचे काम हे दिवत्त्वाचे आहे म्हणून त्यांनी समाजासाठी वेगळी वाट निवडली.
फळाची अपेक्षा न करता कर्म करण्याचे काम निस्वार्थपणे लुसी कुरियन करीत असल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सिस्टर लुसि आधुनिक सावित्रीबाई व मदर तेरेसा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. माहेर संस्थेच्या संस्थापक संचालिका सि. लूसी कुरियन यांनी आपल्या मनोगत मध्ये माहेर संस्थेचे काम समाजातल्या दानशूर लोकांच्या व हीतचिंतकांच्या मदतीमुळे पुढे जात असल्याचे तसेच माहेर मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे वाढत असल्याचे मत व्यक्त केले व सर्वांना सत्ताविसाव्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर संस्थेतील बालकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व बालकांनी नृत्य आविष्कार करून सर्वांची मने जिंकली. तसेच तायकांदो हा धाडसी खेळ प्रकार सादर करून मुलांबरोबरच मुलीही कोणत्याही गोष्टीत कमी नसल्याचे दाखवून दिले. आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे सन्मान व स्वागत माहेर संस्थेतील बालकांनी पर्यावरण पूरक बनवलेल्या वस्तू भेट देऊन करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्नेहालय फाउंडेशनचे गिरीश कुलकर्णी, ऑस्ट्रेयाचे उल्फगॅंग स्वेगर, मिस्टर गॅरेट, वढू गाव चे सरपंच अंजलीताई शिवले, आपटी गावचे सरपंच सुनीताताई शिवले, वाजेवाडी सरपंच पूनम ताई चौधरी, सणसवाडी चे सरपंच रूपालीताई दरेकर, पिंपळे गावचे सरपंच सोनल नाईकनवरे, कोरेगाव भीमाचे सरपंच विक्रम दादा गव्हाणे, पोलीस पाटील जयसिंग दादा भंडारे,
पत्रकार शरद पाबळे, भरारीचे संपादक सुनील भंडारे पाटील,उदयकांत ब्राह्मणे, सर्पमित्र शेरखान शेख, लक्ष्मण पाटील, जीवन टोपे, विठ्ठल वळसे पाटील, सचिन धुमाळ, आकाश बोर्डे, रोहिणी ताई गोसावी, नितीन दादा वाजे, संजय भंडारे, लाला तांबे, गणेश चव्हाण, धर्मराज वाजे, सतीश भोंडवे, पांडुरंग आरगडे, बासू सर, एम ए बागवान, डॉ. एस आर येरमल, खास कर्नाटक इथून आलेले कल्याण शेट्टी, परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या सारिका शिवले, माहेर संस्थेच्या संस्थापिका, संचालिका सि. लूसी कुरियन व अध्यक्ष हिरा बेगम मुल्ला, ट्रस्टी अनिरुद्ध गडांकुश, योगेश भोर, डॉ. प्रदीप शर्मा, डॉ.निकोला पवार, सोसायटी मेंबर एलन डिसूजा, मंगेश पोळ इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्तावना माहेर संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे सूत्रसंचालन रमेश दुतोंडे व टेरेसा अँथोनी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
