शिक्रापूर : प्रा.एन.बी.मुल्ला
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पौड रोड येथील मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात सामूहिक राष्ट्रगीत गायन अत्यंत उत्साहात व जोशात संपन्न झाले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त स्वराज्य सप्ताह अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायन संस्था कार्यालय प्रशासकीय अधिकारी, महाविदयालयातील वरिष्ठ, कनिष्ठ व व्यवसाय विभागातील सर्व विदयार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे, संस्थेतील कार्यालयीन अधीक्षक सिताराम अभंग, संस्थेचे अकाऊंटंट सोंडकर सर, डॉ. योगेश पवार, पाठक सर, महाविद्यालयातील कार्यालयीन अधीक्षक गणेश साबळे, कनिष्ठ, व्यवसाय अभ्यासक्रम व वरीष्ठ महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख तसेच प्राध्यापक उपस्थित होते.

