March 30, 2026
शिक्रापूर : प्रा.एन.बी.मुल्ला
          स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त आंबळे येथील महर्षी शिंदे हायस्कुल एस एस सी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. 

 आंबळे (ता.शिरुर) येथील या कार्यक्रमात आंबळे ग्रामपंचायत व हरीताग्रामर कंपनीच्या सी एस आर फंडामधुन मुलासाठी व मुलींसाठी ४ लाख किंमतीचे अद्ययावत स्वच्छतागृह बांधुन विद्यालयास हस्तंतरीत करण्यात आले. या कार्यक्रमास सरपंच  सोमनाथ बेंद्रे, उपसरपंच अनिल नरवडे, विलास बेंद्रे, मुख्याध्यापक  यशवंत बेंद्रे तसेच सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थीनी हरीताग्रामर कंपनीचे पदाधिकारी, समुदाय विकास अधिकारी, अभियंता भास्कर भानुसे,   अविनाश लाकुडझोडे, ग्रामविकास अधिकारी भानुदास जगताप आदी  उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मेंद्र देशमुखस यांनी केले तर प्राथ.शाळेचे मुख्याध्यापक  अनिल वाखारे यांनी आभार मानले.