March 30, 2026
पुणे जिल्हा प्रतिनिधी
             15 फेब्रुवारीला विधान सभेचं विशेष अधिवेशन भरवलं जाणार आहे. अधिवेशनात मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडला जाणार आहे.अधिवेशनात नव्यानं केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे कायदा बनवला जाण्याची शक्यता आहे.मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनात विधेयक मांडलं जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे,

          मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने अधिसूचना आणली आहे. त्यावर हरकती मागवण्यात आल्या आहेत. हरकतींचा विचार करुन विधेयक अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे. तसेच राज्य मागास वर्ग आयोगाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे त्याचा रिपोर्ट देखील अधिवेशनात मांडला जाणार आहे. अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब होऊ शकते.

          मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन आणले जाईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंनी दिली होती. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये आले होते. त्यांना अधि सूचनेचा कागद मिळाल्या नंतर ते वाशी येथून परत फिरले होते. तसेच अधि सूचनेतील मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी मनोज जरांगे 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार आहेत. या पार्श्वभूमीवर सरकार मराठा समाजाला दिलासा देऊ पाहात आहे.