प्राचीन काळापासून राजे, महाराजे, त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्र असो की इतर सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या मागे एक महिला म्हणून आई, बहिण, पत्नी, मावशी, आजी, तसेच अनेक महिला नातेवाईक खंबीर पणे उभ्या असतात,समाजामध्ये प्रत्येक हिंदू पुरुष महिलांना मानसन्मान देण्यामध्ये कमी पडत नाही, आज देखील आपल्या देशामध्ये महिला पुरुषांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये उभी आहे, राजकारण असो की उद्योग व्यवसाय, सरकारी नोकरी – खाजगी नोकरी यामध्ये महिलांना बरोबरीचे स्थान आहे, आपण पाहतो की देशात संरक्षण देणारी दोन खाती, लष्कर आणि पोलीस खात्यात देखील पुरुषाच्या बरोबरीने महिला देश सेवा करताना कुठेही मागे नाहीत, हे फक्त आपल्याला आपल्या भारत देशात पाहायला मिळते, हिंदू संस्कृतीमध्ये पुरुष हा मरेपर्यंत पत्नीची साथ सोडत नाही, शिवाय पत्नी, आई, मुलगी, बहिण यांना काही कमी पडू नये यासाठी आपले आयुष्य घालवतो, हे फक्त भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये पाहायला मिळते,

