March 30, 2026
 सुनील भंडारे पाटील
                 मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांची उपोषणा दरम्यान प्रकृती अतिशय खालावल्याने त्यांचे गुरु नारायण गडचे महंत शिवाजी महाराज यांनी स्वतः उपस्थित राहून जरांगे यांना औषधोपचार व पाणी घ्यायला लावले, मोठे संकट टळले, जरांगे पाटलांची मराठा समाजाला खूप गरज आहे, असे उपस्थितांनी मत व्यक्त केले,

                   गेल्या दहा तारखेपासून राज्य सरकारच्या वेळ काढू पणाला कंटाळून जरांगे पाटलांनी अन्न पाण्याचा त्याग करत उपोषण आंदोलन छेडले आहे, यावेळी त्यांनी पाणीदेखील पिणार नाही असा कठोर निर्णय घेतल्याने  आज पाचव्या दिवशी शरीरामध्ये पाणी कमी पडल्याने जरांगे पाटलांची शारीरिक क्षमता अतिशय ढासळली होती, अचानक आज सकाळी नाकातून रक्त आलेले, संपूर्ण राज्यात असंतोष पसरला होता,

                   जरांगे पाटील हे नारायण गडचे शिवाजी महाराज यांचे ऐकतात ही बाब सर्वांना समजल्यानंतर तशी सूत्रे हलवण्यात आली, नारायण गडचे महाराज येऊन त्यांनी जरंगे पाटलांना औषधोपचार व पाणी घ्यायला लावली, नारायण महाराजांचे मराठी समाजावर खूप उपकार झाले, कारण आरक्षणाचा लढा हा चालूच राहणार आहे, परंतु माणूस जगणे महत्त्वाचे होते, त्याबद्दल सर्वांनी नारायण महाराजांचे आभार मानले,