बालाजी शैक्षणिक संकुला मध्ये प्रथम दिवशी बालाजी इंग्लिश मीडियम स्कूल यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम पार पडला . भारतीय संस्कृतीचे जतन करणारा भारतीय संस्कृति सौरभम् व महाराष्ट्र संस्कृति वैभवम् या उत्कृष्ट थीम घेऊन दोन्ही दिवसाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन सदाशिव आण्णा पवार होते. कार्यक्रमासाठी बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या खजिनदार, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या माजी चेअरमन (कात्रज डेअरी), संचालिका महाराष्ट्र राज्य दूध महासंघ महानंद डेअरी (मुंबई) केशरताई पवार,
संस्थापक सदस्य बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ, तसेच मा.सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती,आणि मा.व्हाईस चेअरमन घोडगंगा सहकारी साखर कारखाना चे प्रकाश बापू पवार ,तसेच पहिल्या दिवशी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय किशोर राजे निंबाळकर माजी अध्यक्ष महाराष्ट्र लोकसेवा साहेबराव शेळके निवृत्त कर्नल.बाळासाहेब बेंद्रे विशेष लेखा परिक्षक एम.एस.पुणे ,बबन पवार अध्यक्ष शिरूर त्रिदल सैनिक संघटना,रेखाताई कर्डिले सरपंच कर्डिलवाडी , शिल्पाताई गायकवाड सरपंच शिरूर ग्रामीण आदी मान्यवर उपस्थित होते.. दुसऱ्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मा.श्री अक्षय भोरूडे(आय.एफ.एस),मा.सुरेश पाटील निवृत्त कर्नल आणि सोशल वर्कर,सौ.वैशाली गुंजाळ प्रेसिडेंट रोटरी क्लब,पुणे.
अनेक गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य पालक शिक्षक संघाचे सदस्य आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दोन्ही दिवसांचे कार्यक्रम पार पडले.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती , नटराज मूर्ती व श्री राम यांच्या प्रतिमा पूजनाने तसेच,दीप प्रज्वलन करून झाली. विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीताने पाहुण्यांचे व उपस्थितांचे स्वागत केले.
नेहमी उत्साहाने काम करणारे समन्वयक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा देखील सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर गणेश वंदनेने विविध गुण दर्शनाचा कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रमात गायन वादन, भारूड, जोगवा, किर्तन, देशभक्तीपर गीते,शिवमहिमा, रामायणातील प्रसंग आदी कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला होता.
