March 30, 2026
पुणे जिल्हा प्रतिनिधी
             रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा या गोष्टीचा प्रत्यय खरोखरच आज रोजी आला आहे, बारामती मधील यशश्री मेडिकल फाउंडेशन आणि रिसर्च सेंटर भारतीय जैन संघटना पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबवलेल्या मोफत तपासणी व मोफत ऑपरेशन हा उपक्रम दि.6 मे ते 18 मे पर्यंत संपन्न झाला आहे.

या शिबिरामध्ये गर्भाशयाच्या पिशवीचे दुर्बिणीद्वारे तपासणी, ‌ मूलबंद होण्याचे ऑपरेशन अशा एकूण शंभर गरजू रुग्णांची तपासणी ही मोफत करण्यात आली आहे. या शिबिरास उत्स्फूर्त असा प्रतिसाद बारामती परिसरातील महिला वर्गाने दिला आहे.

 या मध्ये जवळजवळ तिस गरजू रुग्णांची मोफत ऑपरेशन ही यावेळी करण्यात आली आहेत तसेच शिबिराचे नियोजन बारामती मधील तज्ञ डॉ.सुनील शहा, डॉ.मेघा शहा, डॉ.यशश्री शहा यांनी शंभर गरजू रुग्णांचे मोफत तपासणी करून यामधील तिस रुग्णांची मोफत ऑपरेशन करण्यात आली आहेत तसेच हे शिबिर यशस्वी होण्यासाठी यशस्वी मेडिकल फाउंडेशन व रिसर्च सेंटर भारतीय जैन संघटना पुणे जिल्हा ग्रामीण यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
 
यामध्ये शिबिराचे आयोजक हे सामाजिक क्षेत्रामध्ये व आरोग्य क्षेत्रामध्ये गोरगरिबांना नेहमी सतत मदत करणारे श्री निखिल रवींद्र मुथा भारतीय जैन संघटना पुणे जिल्हा ग्रामीण तसेच श्री पंकज पोपटलाल गादीया भारतीय जैन संघटना पुणे विभाग यांच्या सहकार्याने बारामती मध्ये चांगल्या प्रकारे शिबिर पार पडले आहे.
बारामतीतील अनेक गरजू रुग्णांना लाभ मिळाला आहे असे डॉ मेघा शहा यांनी माध्यमांना सांगितले आहे वरील उपक्रम राबवल्यामुळे मान्यवरांचे बारामती परिसरामध्ये खूप कौतुक झाले आहे.