March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
      बकोरी (ता हवेली) येथील  देवराई वनराई प्रकल्पात आज महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांचे वाढदिवस वृक्षारोपण करुन साजरे.

 आज बकोरी देवराई वनराई प्रकल्पात महाराष्ट्र राज्याचे मा.उपमुख्यमंत्री मा.श्री अजित (दादा) पवार, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री देवेन्द्रजी फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे नेते मा.श्री गणेश ( बापू) कुटे त्याचप्रमाणे वाघोली येथील नॅशनल चॅम्पियन पै अभिजीत कटके या सर्वांचे वाढदिवस आज बकोरी देवराई वनराई प्रकल्पात वृक्षारोपण करुन साजरे करण्यात आले.    

 सदर वृक्षारोपण कार्यक्रमासाठी उपस्थीतामध्ये वाघोली येथील उद्योजक  संपत (आबा) गाडे, भारतीताई शेवाळे (अध्यक्ष पुणे जिल्हा महीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), सुरेखा भोरडे (अध्यक्ष हवेली तालुका माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), भारतीय जनता पक्षाचे नेते गणेश बापू कुटे, शिवाजी भोरडे,ॲड.किरण अबनावे, नानासाहेब अबनावे, कमलेश बहीरट ( अध्यक्ष हवेली तालुका माहिती सेवा समिती), अजित साळुंखे (उपाध्यक्ष हवेली माहिती सेवा समिती),  रघुनाथ गाडे, धणराज वारघडे बकोरी देवराई वनराई प्रकल्प , धर्मनाथ देवराई वनराई प्रकल्प या दोन्ही प्रकल्पांसाठी अहोरात्र कष्ट करणारे माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे, माहिती सेवा समितीचे शिरुन तालुका अध्यक्ष धर्मराज बोत्रे, संदिप ढफळ हे उपस्थित होते.

   राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा भारतीताई शेवाळे यांनी संपूर्ण प्रकल्प फिरुन पाहनी केली खुप कौतुक केले खर्या अर्थाने त्याठिकाणी असलेल्या चिमण्यांच्या किलबिलाट पाहून खुप समाधान वाटल्याचे सुरेखा भोरडे यांनी सांगितले व सर्व मान्यवरांनी प्रकल्पासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.
   आज सर्व मान्यवरांचे वाढदिवसाच्या निमित्ताने बकोरी देवराई वनराई प्रकल्पात २०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले व निसर्गरम्य परिसरात निसर्गाच्या सान्निध्यात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
    सर्व मान्यवरांचे माहिती सेवा समितीचे माध्यमातून शिरूर तालुका अध्यक्ष धर्मराज बोत्रे यांनी आभार मानले व सर्वानी यापुढील काळात अशाप्रकारे मदत करावी अशाप्रकारची विनंती केली.व कार्यक्रमाची सांगता झाली.