March 30, 2026

सुनील भंडारे पाटील

          शिरुर – पुणे रस्त्यावरील अपघात प्रकरणी रस्त्याची दुरवस्था मुळे भयंकर अपघात होत असुन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
            परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे देखभाल दुरुस्ती केली जात नाही.
        संबंधित महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले असून अनेकांना आपला जीव गमववा लागला आहे, रस्त्यावरील अनेक समस्यांमुळे गंभीर अपघात घडत आहेत,   
         तसेच नवीन रस्त्याचे काम कधी सुरू होणार याबाबत कोणताही ठोस निर्णय होत नाही.
यासंदर्भात आज महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित चे मुख्य अभियंता मा. रणजित हांडे यांची समक्ष भेट घेऊन चर्चा केली. तसेच दिनांक १८ जुन २०२५ पासुन आंदोलनाचे निवेदन दिले. त्यावेळी अभियंता हांडे यांनी तातडीने निर्णय घेऊन दुरुस्तीचे आदेश दिले.
            पुणे नगर महामार्गाच्या समस्येबाबत संजय पाचंगे यांनी कायम आवाज उठवला आहे, प्रत्येक वेळी त्यांच्या लढ्याला यश आले असून यावेळी लवकर रस्त्याची दुरुस्ती व नूतनीकरण झाले नाही तर तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा संजय पाचंगे यांनी दिला आहे,