March 30, 2026
सासवड :प्रतिनिधी : बापू मुळीक 
         पारेश्वर विद्यालय, पारगाव मेमाणे  विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त  ध्वजारोहण  शाळा समिती अध्यक्ष, सर्जेराव मेमाणे यांच्या हस्ते व संचालक लक्ष्मण गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी  पी. एस. मेमाणे साहेब, सेवानिवृत्त सैनिक, सरपंच प्रियंका मेमाणे, उपसरपंच चेतन मेमाणे, पोलीस पाटील सारिका सावंत, विठ्ठल मेमाणे,  तु. रा. मेमाणे,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.     

 स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त निबंध,चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व स्पर्धा, भारताच्या नकाशाची मानवी साखळीने प्रतिकृती, एक राखी जवानासाठी  असे उपक्रम राबवून, अक्षर सृष्टी संस्था व एपिरोक कंपनी तर्फे दप्तर वाटप,थँक शार्प  फाउंडेशन तर्फेशाळेला प्रोजेक्टर, ग्रंथालय पुस्तके, आपुलकी ग्रुप तर्फे  शालोपयोगी साहित्य वाटप,भाटेवरा  फाउंडेशच्या वतीने शालेय इमारत दुरुस्ती इत्यादी बाबीबरोबर  विद्यालयाने शैक्षणिक गुणवत्ता वाढीचा आलेख उंचावलेचे मुख्याध्यापक तुकाराम मुळीक यांनी प्रास्ताविकात सांगितले.  याप्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ताशेठ   झुरंगे यांच्या वतीने पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पॅड चे वाटप करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मदर तेरेसा, झाशीची राणी लक्ष्मीबाई, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ   यांच्या वेशभूषेत  ध्वजाला मानवंदना देऊन कवायत प्रकार घेण्यात आले. यावेळी देशभक्तीपर समूह गीते, महात्मा गांधींनी काढलेल्या दांडी यात्रा चे प्रात्यक्षिक घेण्यात आली. विद्यालयातील पाचवी ते दहावीतील सर्व विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. कै. नीरा मेमाणे गुरुजी यांच्या स्मरणार्थ केंद्रप्रमुख प्रताप मेमाणे यांचेकडून दहावीत प्रथम आलेल्या अपूर्वा मेमाणे हिला ट्रॉफी तर सपना सावंत, आकांक्षा होले व इयत्ता आठवीतील एन एम एम एस परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या साक्षी चावरे  यांना रोख बक्षिसे देण्यात आली. कै. शांताबाई शांताराम मेमाणे यांच्या स्मरणार्थ स्टॅम्प व्हेंडर पी.एस. मेमाणे यांनी रुपये पंचवीस हजार ठेव दिल्याबद्दल त्यांचा व  सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार करण्यात आला.मुलांना खाऊ ग्रामपंचायत पारगाव, सद्गुरु दादा महाराज  जगताप व आप्पासाहेब मगर फार्म यांच्यावतीने करण्यात आले.  या कार्यक्रमास विठ्ठल मेमाणे,  आपुलकी एक जिव्हाळा ग्रुपचे रोहन जगताप निनाद शेटे, विजय आनंत गांजुरे, नितीन मेमाणे, शांताराम सावंत,  बाळासाहेब मेमाणे, अर्चना मेमाणे, ज्योती मेमाणे, तलाठी उमप भाऊसाहेब, ग्रामसेवक खेडेकर भाऊसाहेब,   विलास मेमाणे, सुभाष मेमाणे, जितेंद्र मेमाणे, खंडू मेमाणे, आरोग्य सेविका, मुख्याध्यापक जि. प.धनंजय जगताप, दत्तात्रय बधे, उस्मान मण्यार, सारिका सातव, रजनी कड, शुभांगी जगताप, रूपाली हेंद्रे, कुंजीर मॅडम,  शंकर वाघमारे, अरुण खेडकर, मोहन कुंभारकर, अण्णा लोंढे, रमेश पैठणकर, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उस्मान मण्यार तर आभार दत्तात्रय बधे यांनी मानले.