परमपूज्य जगद्गुरु समर्थ श्री हंबीरबाबा यांचे बावन्नावे पुण्यस्मरण निमित्त अखंड नाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये सकाळी ८ ते ९ .३० योगासने व प्राणायाम, सकाळी ११ते १२प्रवचन , दुपारी १२ते १ , सायं ४ ते ५ व ५ ते ६ आणी रात्री ७ ते ८ अशा प्रवचन सेवांचे कालपासून दि . १० पर्यत आयोजन आहे . रोज उपस्थीत चारशेवर वारकऱ्यांची भोजन व निवास व्यवस्था विश्वव्यापी मानवधर्म आश्रम व पाटेठाण ग्रामस्थांतर्फे दात्यांच्या सौजन्याने करणेत आली आहे . नामसप्ताहाचे उद्घाटन कोरेगावचे माजी सरपंच आबासाहेब गव्हाणे , दौंडचे माजी पं .स . सदस्य मानसिंग आबा शितोळे , शिरुरचे माजी उपसभापती आनंदराव हरगुडे, माजी जि . प . सदस्या वैशाली आबने यांनी केले . सप्ताहात हभप रमेश शिंदे ( करंजावणे ) झगडे महाराज ( धानोरे) रंगनाथ वाडेकर, बबनराव यादव , शिवाजी भालेकर ( वडगाव बांडे) कैलासअण्णा हरगुडे ( सणसवाडी ) अनिल नाईक , रत्नाकर कुदळे , शिवाजी झेंडे (खामगाव ) शकुंतला आलेकरी (पुणे) हभप फलकेताई ( शिरुर ) भानुदास खळदकर , विठ्ठल आबा सातव , गजानन घोळे (पाटेठाण ) सुभाष पंडीत (खामगाव ) बबन जगताप , मोतीराम कुंभार (तळेगाव ढमढेरे) सोनबा शेलार (तळेगाव ) सिताराम दरेकर ( दरेकरवाडी ) जयश्रीबोरावणे , अमित शहाणे (पाटेठाण ) अमोल देशमाने ( पेठ वाळवा) दत्तात्रय तमनर ( राहूरी ) विजय मुळे ( देवीभोयरे ) अविनाश साळुंके (सादलगाव ) शंकर हंबीर , राजेंद्र हंबीर (पाटेठाण ) काळुराम कारंडे , नंदू खलसे( राहू ) कैलास सातव ( वाघोली ) हभप चोरमले ( तिळापतिळापुर ) हभप काकडे ( वडगाव शिंदे ) निर्मलनाथ महाराज , निलेश लोंढे , स्वामी ज्ञान चैतन्य , निघोट ( आळंदी ) सुरेश साठे ( नागरगाव ) तुकाराम फंड ( रांजणगाव ) ज्ञानेश्वर बर्डे ( चर्होली ) आदीं महाराजांची प्रवचनसेवा आयोजीत आहे . तरी भावीकांनी या अन्न व ज्ञानदान पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन नामसप्ताहाचे आयोजक व पाटेठाण ग्रामस्थांनी केले आहे .

